×

Video: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्यालाही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, आजीसोबत लावले ठुमके

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना अभिनित ‘पुष्पा‘ चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनाच नाही, तर मोठमोठ्या सेलिब्रेटींनाही वेड लावले आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बॉलिवूड कलाकारांसोबतच क्रिकेटपटू देखील या चित्रपटाच्या गाण्यांवर रील तयार करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर गेला आहे. मात्र, असे असूनही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. त्यामागील कारण म्हणजे हार्दिक सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो इंस्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळी त्याने ‘पुष्पा’ चित्रपटातील एका गाण्यावर आपल्या आजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हार्दिकने (Hardik Pandya) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आजीसोबत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. “हमारी अपनी पुष्पा नानी” असे कॅप्शन त्याने व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “ती (नानी) सुपर क्यूट आहे.” हार्दिकची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकनेही (Natasa Stankovic) यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हार्ट इमोजी शेअर करून लिहिले की, “क्यूटेस्ट.”

सोशल मीडियावर हार्दिकच्या या व्हिडिओला प्रचंड पसंती दिली जात आहे. काही तासांतच या व्हिडिओला २२ लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये लोक या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. रवींद्र जडेजा, सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ड्वेन ब्राव्होनंतर आता भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

अल्लू अर्जुननेही केली कमेंट
हार्दिकला आजीसोबत डान्स करताना पाहून ‘पुष्पा’चा नायक अल्लू अर्जुनही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने कमेंट केली, “खूप क्यूट, खूप प्रेम आणि आदर, हृदयस्पर्शी डान्स.” हा व्हिडिओ इतका लोकप्रिय होत आहे की, अल्पावधीतच त्याला ९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा-

Latest Post