‘हिला पहिलं डॉक्टरांकडे न्या’ कंगनाच्या ट्विट्समुळे चाहत्यांनी केली अजब मागणी, पाहा मीम्सचा पडलेला पाऊस


कंगना राणावत हे नाव उच्चारले की, ओघाने वाद हा शब्दसुद्धा येतोच. कंगना नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे, तिच्या ट्विट्समुळे चर्चेत असते. अनेकदा किंबहुना नेहमीच ती यामुळे वादही ओढवून घेते. तिच्या काही व्यक्तव्यांवर हसावे की रडावे हेच समजत नाही. नुकतेच कंगनाने शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणून संबोधले होते, त्यावरून तिच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल झाली. हे होत नाही तोवर तिने आता एक ट्विट केले आहे जे वाचून तुम्हालाही जरा विचित्रच वाटेल.

कंगनाने ट्विट करत स्वतःला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजपेक्षा अधिक चांगले ऍक्शन करणारी अभिनेत्री म्हटले आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये तिची आणि टॉम क्रूजची तुलना केली. या आधी ट्विट करत तिने तिची तुलना हॉलिवूड मेरिल स्ट्रीप आणि गैल गडॉट या अभिनेत्रींसोबत करत स्वतःला या पृथ्वीवरील सर्वात चांगली अभिनेत्री असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने दुसरे ट्विट करत ती टॉम क्रूजपेक्षा खूप चांगली ऍक्शन करू शकते असे म्हटले आहे.

यादीच्या ट्विटमध्ये तिने मेरिल स्ट्रीप आणि गॅल गडॉट या अभिनेत्रींसोबत तुलना करताना लिहिले की, ” सध्याच्या काळात मी एक कलाकार म्हणून चित्रपटांमधून ज्या विविध भूमिका मी साकारल्या आहेत, अशा विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री संपूर्ण पृथ्वीवर सापडणार नाही. माझ्याकडे मेरिल स्ट्रीप सारखी प्रचंड प्रतिभा तर आहेच सोबतच गॅल गडॉट सारखे ग्लॅमर देखील आहे.”

ती याच्यावरच नाही थांबली तर तिने सर्वाना खुले आव्हान देत सांगितले की, “मी खुल्या चर्चेसाठी तयार आहे. जर पृथ्वीवरच्या कोणत्या अभिनेत्रीने मला दाखवून दिले की, ती माझ्यापेक्षा जास्त चांगला अभिनय आणि विविध भूमिका करू शकते, तर मी माझा गर्व सोडून देईल.”

कंगना तिच्या या ट्विटमुळे आता सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे. तिच्यावर अनेक मिम्स तयार होतच आहे, शिवाय तिला अनेकांनी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देखील दिला आहेत. पाहूया यावर आधारित काही फनी मिम्स.

आता कंगना हे सर्व मुद्दाम करते की, तिला खरंच असं वाटते देव जाणे. २०२१ आणि २०२२ मध्ये कंगनाचे धाकड, थलाईवी आणि तेजस असे तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.