विवाह संपन्न होण्याआधीच गुगलवर कॅटरिना आणि विकी यांना ‘पतीपत्नी’ करार


बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाच्या चर्चा मागील खूप दिवसांपासून होत आहेत. हे दोघं ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार असून, कायमसाठी एक होणार आहेत. अजून कॅटरिना आणि विकी यांचे लग्न झाले नसले तरी गुगलवर आणि विकिपीडियावर कॅटरिना आणि विकीला नवरा बायको म्हणून दाखवले जाण्यास सुरुवात देखील झाली आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल गुगलवरील विकिपीडियावर नवरा बायको म्हणून घोषित केले आहे. विकिपीडियाच्या प्रोफाईल वर हे दोघं पती पत्नी अर्थात एक जोडपे असल्याचे दाखवले जात आहे. पण विकी आणि कॅटरीना अजूनही त्यांच्या लग्नावर काहीही बोलले नाही. चालू असणाऱ्या तयारींवरून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांवर कॅटरिना किंवा विकी यांच्या कुटुंबीयाने देखील काहीच वक्तव्य केले नाही. चाहत्यांनी जेव्हा हे विकिपीडियाचे पेज पहिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

Photo Courtesy: Instagram/google

गुगलवर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ नाव शोधल्यावर तिच्या नावापुढे जोडीदाराचे नाव दाखवत आहे. कॅटरिनाच्या जोडीदाराचे नाव विकी कौशल असं दाखवत आहे. तर विकीच्या प्रोफाइल वरती कॅटरिनाचे नाव दिसत आहे. खरंतर विकिपीडियावरती सर्व गोष्टी खऱ्या असतात. तिथे जोडीदाराच्या नाव लिहिले नाही. पण तसे पाहिले तर विकी आणि कॅटरिना ९ डिसेंबरला दोघे लग्न करणार आहे. मात्र त्यांच्या त्यांना वधूवराच्या रूपात पाहता येणार नसल्याने नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत खूपच गुप्तता पाळली असून, कोणत्याही गोष्टींचे फोटो किंवा त्यांचे फोटो लीक होणार नाही खबरदारी घेतली आहे. सर्व चाहत्यांना कॅटरीनाला नवरीच्या रूपात पाहायचे आहे. लग्नामध्ये पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’ केली आहे. कॅटरिना आणि विकी यांचे हे शाही लग्न सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा-

रोखठोक कंगना: कॅटरिना कैफपेक्षा विकी कौशल ५ वर्षांनी लहान; अभिनेत्री म्हणाली, ‘चांगलंय…’

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शाहिद कपूर-मृणाल ठाकूरची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे जर्सी सिनेमातील ‘माइया मैनु’ गाणे प्रदर्शित


Latest Post

error: Content is protected !!