कॅटरिना कैफ करणार विकी कौशलसोबतच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा? आगामी चित्रपटात इंटिमेट सीन न करण्याची चेतावणी

Katrina Kaif warns Vicky kaushal against intimate scenes in movies


बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या नेहमी येत असतात. अनेक दिवसांपासून अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे डेट करत असल्याची बातमी येत आहे. या दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना त्यांच्या रिलेशनची हिंट दिली आहे. परंतु या दोघांनी ही अजून त्यांच्या रिलेशनबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाहीये.

माध्यमातील वृत्तानुसार, कॅटरिना कैफ त्यांच्या या नात्याचा अधिकृतरीत्या स्वीकार करायला तयार आहे. पण विकी कौशलच्या वडिलांना त्यांचे हे नाते मान्य नाहीये. दुसरीकडे कॅटरिनाने विकीला पुढील चित्रपटात इंटिमेट सीन्स न देण्यास सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, कॅटरिना कैफ आता विकी कौशलसोबत असलेल्या तिच्या नात्याला सार्वजनिक आणि अधिकृत करायचे आहे. कॅटरिनाने विकी कौशलला त्याच्या आगामी चित्रपटात इंटिमेट सीन्स करण्यास मनाई केली आहे. विकी कौशलचा आगामी चित्रपट सारा अली खानसोबत ‘इम्मोर्टल अश्वत्थामा’ हा असणार आहे. कॅटरिनाने त्याला सांगितले आहे की, तो या चित्रपटात कोणतेही इंटिमेट सीन देणार नाही. परंतु आता नक्की काय होईल या गोष्टीची माहिती हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समोर येणार आहे. कॅटरिनाला भले ही त्यांचे नाते सार्वजनिक करायचे आहे, पण विकी कौशलचे वडील त्यांच्या नात्यामुळे खुश नाहीत. त्यांनी याआधीच नाराजी व्यक्त केली आहे.

मागच्या वर्षी अंबानी यांच्या होळीच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा कॅटरिना आणि विकीला रोमँटिक अंदाजात पाहिले होते. यांनतर कॅटरिनाच्या घरी क्रिसमस पार्टीला विकी गेला होता. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांनी हा गोष्टीची हिंट दिली आहे. त्यामुळे सगळे प्रेक्षक त्यांना आधीपासून ‘विकॅट’ या नावाने ओळखतात.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, विकी ‘इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे, तर कॅटरिना ‘फोन बूथ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच या वर्षी तिचा सर्वात मोठा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. सोबतच या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.