फेमिना मिस इंडिया २०२० च्या टॉप ३ विजेत्यांच्या नावांची घोषणा; मानसा वाराणसीने पटकावला खिताब

Manasa Varanasi Become VLCC Femina Miss India 2020 Manya Singh And Manika Sheokand Are Runner


VLCC फेमिना मिस इंडिया २०२० चा खिताब २३ वर्षीय फायनँशियल एक्सचेंज इन्फॉर्मेशन ऍनालिस्ट मानसा वाराणसी हिने आपल्या नावावर केला आहे. फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हीएलसीसीच्या टॉप ३ विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. १० फेब्रुवारी आयोजित केलेल्या फेमिना मिस इंडिया २०२० च्या ग्रँड फिनालेमध्ये तेलंगणाची मानसा हिने मिस इंडियाचा मुकुट जिंकला. तसेच मान्या सिंग प्रथम आणि  मनिका श्योकंद द्वितीय उपविजेते ठरले.

टॉप ५ मध्ये या ब्यूटी क्वीन सामील
खुशी मिश्रा, मान्या सिंग, मानसा, रती हुलजी आणि मनिका श्योकंद यांचा फेमिना मिस इंडिया २०२० च्या टॉप ५ मध्ये समावेश आहे.

कुठे आयोजित केला होता इव्हेंट?
VLCC फेमिना मिस इंडिया २०२० च्या ग्रँड फिनालेचे आयोजन मुंबईच्या प्लश हॉटेलमध्ये केले होते. वाणी कपूर, चित्रांगदा सिंग, नेहा धुपिया, अपारशक्ती खुराना आणि पुलकित सम्राट यांसारखे दिग्गज कलाकार या खास इव्हेंटमध्ये उपस्थित होते. बॉलिवूड स्टार अभिनेता अपारशक्ती खुरानाने या इवेंटचे होस्टिंग केले, तर नेहा धुपिया या मेगा इव्हेंटची अधिकृत प्रतिभा मार्गदर्शक होती.

इव्हेंटमध्ये सामील झाले हे दिग्गज कलाकार
पुलकित सम्राट आणि चित्रांगदा सिंग हे या फिनाले इव्हेंट पॅनेलचे सदस्य होते आणि वाणी रात्रीची स्टार परफॉर्मर होती. आऊटफिटबद्दल बोलायचं झालं, तर नेहा धुपियाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आऊटफिट घातले होते, तर चित्रांगदा सुंदर अशा पिवळ्या आऊटफिटमध्ये दिसली.

याव्यतिरिक्त अपारशक्ती खुराना आणि पुलकित सम्राट सूट-बूटातील अंदाजात दिसले, तर वाणीने चमकदार डार्क ड्रेस घातला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.