Thursday, June 13, 2024

‘वेड’ चित्रपटाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रितेश आणि सलमानची धमाकेदार एंट्री

मराठी आणि हिंदी चित्रपाटांमध्ये आपल्या दमदार अभिनेयाने प्रेक्षकांना वेड लावणारा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी येणारा ‘वेड‘ चित्रपटामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. रितेश आणि जिनेलिया यांच्या शाळकर प्रेमाची लव्हस्टोरी वेड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘वेड लावलंय‘ या गाण्याचा टीझर प्रद्रशित झाला आहे.

बॉलिवूडमधील चाहत्यांचं लाडकं जोडपं म्हणून रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या जोडीकडे पाहिले जातं. यांच्या जोडीने एकत्रित मोजक्याच चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा ही जोडी ‘वेड’ (Vedh) चित्रपसलमान खानटामध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील ‘बेसुरी‘ (Besuri) आणि ‘वेड तुझे‘ Vedh Tujhe) या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता पुन्हा एकदा याचित्रपटामधील एक नवीन गाणं म्हणजेच ‘वेड लावलंय'(Vedh Lavlay) या गाण्याचा 30 सेकंदाचा टीझर प्रदर्शित झाला असून या गण्यामध्ये रितेश आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) देखिल पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शित झालेली व्हिडिओ क्लीप 30 सेकंदाची असून यामध्ये सलमान आणि रितेश धमाकेदार डान्स करताना दिसून येत आहे. यामध्ये सुरुवातीला सलमानची धमाकेदार एंट्री पाहायला मिळते आणि मग रितेशला दाखवले जाते. दोघेही मद्यपाणासोबत जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत. यापूर्वीदेखिल सलमानने रितेशचा ‘माऊली‘ (Mauli) चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकराची भूमिका निबावली होती, पण यावेळेस तो फक्त गाण्यामध्ये आहे की, चित्रपटामध्येही आहे हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छोटे भाईजान’चा ‘बिग बॉस’सोबतचा प्रवास संपाला? अब्दूला रडताना पाहून चाहतेही नाराज

‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ या सदाबहार गाण्यावर मुमताजने लावले ठुमके, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा