‘देसी क्वीन’ सपना चौधरीचा ‘रोटिया के टोटे’ गाण्यावर जबराट डान्स; व्हिडिओला करोडो हिट्स

Sapna Choudhary Dance On Rotiya Ke Tote Haryanvi Song Video Breaking Internet


‘देसी क्वीन’ या नावाने ओळखली जाणारी सपना चौधरी आपल्या चाहत्यांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे डान्स व्हिडिओ रिलीझ होताच सोशल मीडियावर धमाल करतात. ती आपल्या डान्समुळेही बरीच चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ रिलीझ झाला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सपना हरयाणवी ‘रोटियां के टोटे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सपनाचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

सपनाचा हा व्हिडिओ टशन हरयाणवी यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, आतापर्यंत हा व्हिडिओ १ कोटी ७५ लाखांपेक्षा अधिकवेळा पाहिला आहे.

तसेही तिच्या डान्समुळे तिला हरयाणामध्येच नाही, तर संपूर्ण भारतात तिला ओळख मिळवून दिली आहे. सपनासाठी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून डान्स कार्यक्रमांसाठी ऑफर येत असतात. सपना सोशल मीडियामार्फतही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

सपना चौधरीच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने हरयाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीसोबत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. हळूहळू सपना हरयाणा आणि शेजारच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली आणि त्यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये चांगली वाढ झाली. त्यानंतर सपना ‘बिग बॉस ११’चाही भाग बनली आणि तिला चांगली प्रसिद्ध मिळाली. सपनाचा नुकतेच एक गाणे रिलीझ झाले आहे, या गाण्याचे नाव ‘लोरी’ असे आहे.

याव्यतिरिक्त सपनाविरुद्ध एफआयआरदेखील नोंदवण्यात आली आहे. ही एफआयआर एका कंपनीने नोंदवली आहे. सपनाने कोट्यावधी रुपये घेऊनही कार्यक्रमाला हजेरी न लावल्यामुळे तिच्यावर फसवणूकीचा आरोप लावण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.