काय सांगता!! श्रुती हसनने सुपरमार्केटमध्ये सर्वांसमोर बॉयफ्रेंडला केले किस? फोटो होतोय जोरदार व्हायरल


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका मिरवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन होय. ती तिच्या चित्रपटामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नुकतेच श्रुती तिच्या बॉयफ्रेंड शांतनू हजारिका आणि बेस्टफ्रेंड अमृता रामसोबत शॉपिंग करायला गेली होती. सुपर मार्केटमधील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये श्रुती शांतनूला किस करताना दिसत आहे. ते दोघे मागील अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. (Shruti haasan kissed her boyfriend in super market, photos get viral)

माध्यमातील वृत्तानुसार श्रुती सध्या शांतनूसोबत राहत आहे. त्यांनी मुंबईमधील एक प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू केला आहे. पण याबाबत त्यांनी अजूनही कोणती माहिती दिली नाही. शनिवारी (१७ जुलै) श्रृती, शांतनू आणि अमृतासोबत ग्रोसरी शॉपिंग करायला गेली होती. तिने सुपरमार्केटमध्ये काढलेले काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहे. यातील एका फोटोत श्रुती शांतनूला किस करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच तिचे चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

माध्यमातील वृतानुसार श्रुतीने याआधी शेवटचे ‘वकील साहब’ या चित्रपटात काम केले

आहे. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने पवन कल्याणसोबत काम केले होते. हा तेलुगूमधील ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक होता. सध्या ती एक वेबसीरिजची शूटिंग करत आहे. यासोबतच ती प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

-फिल्म इंडस्ट्रीबाबत राजपाल यादवचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्थिक तंगी दरम्यान इंडस्ट्रीने मला…’

-बिग बींच्या ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी अंत; लहानपणीच केली होती तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी


Leave A Reply

Your email address will not be published.