केवळ ‘त्या’ व्यक्तीमुळे अमिताभ-जयाच्या बच्चनच्या नात्यात लग्नानंतरही आला होता दुरावा!

This is the main reason why jaya bacchan was not invited to her wedding to Rekha


बॉलिवूडमधील काही अशा प्रेमकथा आहेत, ज्या कितीही वर्ष झाली तरी विसरता न येण्यासारख्या आहेत. आणि त्यातच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील ऑफस्क्रीन अफेयर हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चा झालेलं अफेयर आहे. रेखाची जोडी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वाधिक हिट ठरली होती, त्यामुळे त्यांची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री आजही चर्चेचा विषय असल्याचे बोलले जाते.

ज्यावेळी जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न झाले होते, त्यानंतर काही वर्षांनंतर रेखा आणि अमिताभ यांच्या अफेयरच्या चर्चांना उत आला होता. जया-अमिताभ आणि रेखा यांचा या कौटुंबिक तिढा कधीही न सोडवता येण्यासारखा आहे. हे कोणापासून लपले नाही की जयाशी लग्नानंतरही अमिताभ रेखाच्या अगदी जवळचे संबंध बनून राहिलेत आणि यामुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर याचा खूप खोलवर परिणाम झाला होता. त्या वेळेस यांच्या अफेयरच्या चर्चा रंगत असताना रेखा आई बनणार आहे अशी बातमी देखील अधिक प्रमाणात वायरल झाली होती, ज्यामुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर सुद्धा अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती.

आपल्या एका मुलाखतीत रेखाने सांगितले होते की, “मी जयाला नेहमीच अतिशय साधी स्त्री मनात असे. एवढेच नव्हे तर ती मला माझ्या बहिणीसारखी आहे. तिने बऱ्याचदा मला चांगले सल्ले देखील दिले आहेत आणि नंतर मला कळले की ती फक्त आपल्या प्रभाव वाढविण्यासाठी असे करत आहे. आम्ही एक इमारतीत राहून सुद्धा तिने मला तिच्या लग्नाला बोलवले नव्हते.”

तथापि, जया बच्चन या रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर होणाऱ्या बातम्या नेहमीच चांगल्या प्रकारे हाताळत असत. आपल्या एका मुलाखतीदरम्यान जया बच्चन म्हणाली होती की, “आपण मानव आहोत, प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे हा आपला स्वभाव आहे. जर आपण चुकीच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देत आहोत तर बरोबर असणाऱ्या गोष्टीवर देखील प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे. इथे फक्त दोन गोष्टीवर बोलले जाते, जर तुम्ही आनंदी आहात तर आहात आणि जर तुम्ही दुखी आहात तर फक्त दुखीच आहात.”

अमिताभ बच्चन आणि रेखाने पहिल्यांदा ‘दो अनजाने’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यात दोघांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘मूकद्दर का सिकंदर’ हा या दोघांचा दुसरा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. त्यानंतर बिग बी आणि रेखा यांच्या ‘सुहाग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई केली होती. सिलसिला हा चित्रपट अमिताभ आणि रेखाच्या लव्हस्टोरीसाठी आजही ओळखला जातो. तसेच या चित्रपटात जया बच्चन देखील होती. ज्या ज्या वेळी अमिताभच्या रोमान्सची चर्चा होते, त्यावेळी या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.