Tuesday, June 18, 2024

स्मृती इराणीची लेक शेनेलच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखचीच हवा, एकदा पाहाच फाेटाे

केंद्रीय महिला, बालविकास मंत्री आणि सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी यांची लेक शेनेल इराणी या महिन्यात 9 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकली. राजस्थानमधील जोधपूर शहरातील एका सुंदर किल्ल्यात शेनेलने अर्जुन भल्लासोबत लग्नगाठ बांधली आहे. शानेल आणि अर्जुनच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी, लग्नानंतर, शेनेल आणि अर्जुन यांनी राॅयल रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूडपासून टीव्ही जगतातील अनेक स्टार्सनी आपली उपस्थिती नोंदवली होती. बॉलिवूडचा ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खानही लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला होता, ज्याचे फाेटाे साेशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत असून चाहते या नवीन जाेडप्याला शुभेच्छा देत आहेत.

स्मृती इराणी (smriti irani) आणि झुबिन इराणी यांची लेक शेनेल इराणी (shanelle irani) हिचे राॅयल रिसेप्शनही राजस्थानमध्येच पार पडले. ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खानही (shah rukh khan) या रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो मौनी रॉय हिने (mouni roy) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खानसोबत मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियारही दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

शानेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या रिसेप्शन पार्टीत टीव्ही क्वीन एकता कपूर तिचे वडील अभिनेते जितेंद्रसोबत पोहोचली होती. त्याचवेळी भोजपुरी अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली, तर टीव्हीवर स्मृती इराणीच्या पतीची भूमिका करणारा अभिनेता रोनित रॉय पत्नी नीलमसोबत पार्टीत सहभागी झाला होता. यादरम्यानचे सर्व फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात असून माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहेत.( tv actres ssmriti irani daughter shanelle irani arjun bhalla wedding reception shah rukh khan mouni roy ronit roy ekta kapoor ravi kishan attend party photos viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाैदल अधिकाऱ्याच्या मुलीने 14 वर्षात केले 19 चित्रपटांमध्ये काम, वाचा अभिनेत्रीचा रंजक प्रवास

निर्मात्यांनी पैसे वाढवल्यावर अनुपमा परमेश्वरन दिला होता आशिष रेड्डीसोबत किसिंग सीन करण्यास होकार

हे देखील वाचा