‘द राॅक’ बनणार अमेरिकेचा राष्ट्रपती? अभिनेत्याने इच्छा व्यक्त केल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Hollywood Actor Dwayne Johnson Speaks On Interest In Politics Wants To Consider US Presidential Elections


जगभरातील अनेक कलाकारांना राजकारणाविषयी उत्सुकता असल्याचे आपण पाहिले आहे. यामध्ये रजनीकांतपासून ते हेमा मालिनीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यातच आता ‘द रॉक’ या नावाने प्रसिद्ध असलेला हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉन्सननेही पुन्हा एकदा आपली राजकीय महत्वाकांक्षा जाहीर केली आहे. ड्वेनने तो आताही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘फास्ट एँड फ्युरियस’ चित्रपटातील अभिनेता ड्वेनने म्हटले की, ‘जर प्रेक्षकांना हवे असेल, तर मी भविष्यात राष्ट्रपतीपदासाठी निश्चितच निवडणूक लढवीन.’

पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी जे काही करत आहे, ते मी पूर्ण विश्वासाने करत आहे. मी दिलेल्या शब्दावरून कधीच माघार घेणार नाही. सर्वकाही जनतेवर अवलंबून आहे, त्यामुळे मी सध्या वाट पाहील आणि प्रेक्षकांना काय हवं आहे, हे मी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करेल.”

ड्वेनने काही वर्षांपूर्वीच राजकारणात रस असल्याचे सांगितले होते. सन २०१७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्याने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली होती.

माजी कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन आजकाल आपल्या नवीन ‘यंग रॉक’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याची ही सीरिज १६ फेब्रुवारीला एनबीसीवर येणार आहे.

ड्वेनने आतापर्यंत ‘फास्ट एँड फ्युरियस’, ‘हॉब्स एँड शॉ’, ‘रँपेज’, ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘द ममी’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा स्लीपिंग पार्टनर, ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर
-इंजिनीअरिंग केल्यानंतर वळला होता मॉडेलिंगकडे, कष्ट करून मिळवली लोकप्रियता, वाचा संदीप नाहरचा संघर्षमय प्रवास
-‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक


Leave A Reply

Your email address will not be published.