नाव कमावण्यासाठी बॉलिवूडच्या ‘या’ बहाद्दरांनी बदलले आपले खरे ‘नाव’, प्रसिद्ध अभिनेत्रींचाही समावेश


चित्रपट सृष्टीमध्ये आपलं नावं बनवण्यासाठी कलाकार काहीही करायला तयार असतात. मोठ्या पडद्यावर आपलं नाव कमावण्यासाठी सगळेच कलाकार खूप मेहनत घेतात. एवढंच काय काही कलाकारांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी आपलं नावं देखील बदललं आहे.  आज त्याच‌ नावाने ते सर्वत्र प्रसिध्द आहेत. यामध्ये काही नामवंत कलाकारांची देखील नाव आहेत. ज्यांची खरी नावं कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार याचं खरं नाव ‘राजीव हरी ओम भाटिया’ असे आहे. अक्षयने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या आधी त्याचं नावं बदललं. आज त्याच्या याच नावाने त्याला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली आहे. अक्षय हा मूळचा पंजाबचा आहे. अक्षयचा जन्म 9 सप्टेंबर 1967 मध्ये पंजाब येथे झाला होता.

सनी लियोनी
बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सनी लियोनी हिने देखील आपलं नावं बदललेल आहे. सनीचं खरं नाव ‘करनजीत कौर वोहरा’ हे आहे. परंतु आज हे नाव कोणालाच माहीत नसेल. सनीने स्वत: हून तिचे नाव बदलले आहे.

सनी देओल
सनी देओल हा बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र याचा मुलगा आहे. त्याने देखील या इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी आपले नाव बदलले आहे. सनीचं खरं नाव ‘अजय सिंग देओल’ हे आहे. सनी देओलने वेगवेगळे सिनेमे करून आपल्या नावाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

प्रीती झिंटा
प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील खूपच नावाजलेली अभिनेत्री आहे. परंतु बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी तिने देखील तिचे नाव बदलले आहे. प्रीती झिंटाचं खरं नाव ‘प्रीतम जिंता’ हे आहे. प्रीतीचा जन्म हिमाचलमध्ये 31 जानेवारी 1975 मध्ये झाला.

दिलीप कुमार
चित्रपटसृष्टीतील एक चमकता सितारा म्हणजे ‘दिलीप कुमार’. त्यांनी देखील आपले नाव बदलले होते. त्यांचं खरं नाव ‘मोहम्मद युसुफ खान’ हे आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये झाला होता. त्यांनी अनेक सिनेमे बॉलिवूडला दिले, जे चाहत्यांना आजही भावतात.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी ही एक मल्टीटॅलेंटेड अभिनेत्री आहे. ती अभिनयासोबतच डान्स देखील अत्यंत उत्कृष्टरीत्या करते. तसेच ती योगा शिक्षिका देखील आहे. तिने देखील आपल नावं बदलून बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

शिल्पाचं खरं नाव ‘अश्विनी शेट्टी’ हे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

‘चड्डी दिसली पाहिजे, नाहीतर लोक चित्रपट का पाहतील’, प्रियांकाने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.