Thursday, September 28, 2023

‘चंद्रावर बसणारा पहिला भारतीय…’; सचिन पिळगांवकरांनी शेअर केला ‘तो’ फोटो

बुधवारी (23ऑगस्ट) भारताच नव्हे तर संपूर्ण जगाच लक्ष ‘चांद्रयान -3’कडे लागले होते. अखेर तो क्षण आला आणि भारताने इतिहास घडवला. ‘चांद्रयान -3‘ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत भारताची मान उचावली आहे. संपू्र्ण भारतीयांनी यावर आनंद व्यत्त केला आहे. मोठ मोठ्या सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ती पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते पोस्ट लिहून त्याच्या चाहत्यांना अनेक छोट्यामोठ्या गोष्टी सांगत असतात. त्यांनी नुकतीच ‘चांद्रयान -3’वर एक पोस्ट केली. या पोस्टनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्ट करताना एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्या चित्रपटातील डोहाळ जेवणातील आहे.

या फोटोमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे पार्वतीच्या वेशात चंद्रावर बसलेले दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “चंद्रावर बसणारा पहिला भारतीय.” सोशल मीडियावर हा फोटो तूफान धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

यावर कमेंट करताना लिहिले की, “पहिल्या भारतीय व्यक्तीला चंद्रावर बसवण्याचा मान तुम्हालाच आहे, सर.” दुसऱ्याने लिहिले की,”i miss u sir…..लक्ष्या खरच खूप खूप आठवण येत आहे तुझी…परत येना एकदा लक्ष्या ..तुझी आणि अशोक मामाची जोडी खरच सुपर हिट होती.:” तर आणखी एकाने लिहिले की, “हा क्षण कधीच मनातून पुसला जाणार नाही…मराठी माणसाच्या..” ही पोस्ट पाहून चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण येत असल्याचे म्हणत कमेंट केली आहे.

अधिक वाचा- 
प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक; अभिनेते म्हणाले, ‘बाबा तुम्ही जातानाही आम्हाला…’
नागराज मंजुळेंचा नाद भरी प्रवास! आधी ॲक्टर मग डायरेक्टर आता थेट डॉक्टर

हे देखील वाचा