एकता कपूरने केले गुपचूप लग्न? तिचा सिंदूर लावलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


सध्या मनोरंजन सृष्टीमध्ये लग्नाचे वारे तर वाहत आहेतच, सोबतच अनेक कलाकारांच्या घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. मागच्याच महिन्यात विराट आणि अनुष्काच्या मुलीचा जन्म झाला. लवकरच करीना कपूर देखील आई होणार आहे. सोबतच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील काही कलाकारांच्या घरात नवीन बाळांचे आगमन झाले आहे. नुकतंच टीव्हीची लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानीची देखील डिलिव्हरी झाली आहे.

अनिताने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. ही माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना तिची जवळची मैत्रीण आणि डेली सोप क्वीन एकता कपूर तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहचली. तिने अनिताला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा तर दिल्याच, सोबतच प्रत्यक्ष भेटून सुद्धा ती अनिताच्या आनंदात सहभागी झाली.

एकताने तिचा आणि अनिताचा हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून खूप चर्चेत आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे व्हिडिओमध्ये एकताने तिच्या भांगेत लावलेले कुंकू. हा व्हिडिओ अनिता आणि अनिताला दिलेल्या शुभेच्छांपेक्षा जास्त याच कारणाने लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी कमेंट करत एकताने लग्न केले का? तिने सिंदूर का लावला आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. या सर्व प्रश्नांनाही उत्तर अजूनही मिळाली नसली, तरी प्रेक्षकांच्या मनात एकताच्या लग्नाबद्दल उत्सुकता वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी एकताने तिचा आणि तनवीर बुकवालाचा एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता, आणि लिहिले होते, “…आणि आम्ही इथे आहोत. लवकरच तुम्हालाही सांगू.” तिच्या या पोस्टवर तनवीरने कमेंट केली होती की, “आता ही मैत्री नातेसंबंधात बदलण्याची वेळ आली आहे.”

एकताच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे खूप लक्ष वेधून घेतले होते. त्यावरूनच एकताने लग्न केले असावे, म्हणून तिने सिंदूर लावला असल्याच्या अशा चर्चा रंगत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.