‘चुरा के ऍड मेरा… फराह खान चली’, म्हणत शिल्पाने शेअर केला तिचा आणि फराहचा मजेशीर व्हिडिओ


आपल्या जबरदस्त फिटनेससाठी आणि डान्ससाठी ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी प्रचंड लोकप्रिय आहे. बाजीगर चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात आलेल्या शिल्पाने कोणत्याही पाठिंब्याशिवाय या चित्रपटसृष्टीमध्ये यश मिळवले. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. शिल्पाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

शिल्पाच्या या व्हिडिओत ती आणि फराह खान भांडताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसणारी शिल्पा एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आली असून, ती चित्रीकरण सुरू होण्याची वाटत पाहत आहे. तेवढ्यात तिथे फराह खान पोहोचते आणि लगेच म्हणते, “ही जाहिरात आधी मी करणार होते. मात्र, आता या जाहिरातीत शिल्पा आली आहे,” असे म्हणत फराह शिल्पाने माझ्या पोटावर पाय दिला आहे असा आरोप लावताना दिसली. तिच्या या आरोपावर शिल्पा शेट्टी म्हणते, “हा पोटाचा प्रश्न आहे. ही जाहिरात मला माझ्या पोटामुळेच मिळाली आहे. आता ही जाहिरात आपण दोघी मिळून करू.”

हा व्हिडिओ पोस्ट करताना शिल्पाने लिहिले, “चुरा के ऍड मेरा… फराह खान चली, जब काम मस्ती बन जाता है…” शिल्पा आणि फराह खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास २० लाख नेटकऱ्यांनी पाहिले आहे. शिवाय अनेक फॅन्सने या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून १३ वर्षांनंतर शिल्पा पुन्हा चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. हे दोन्ही सिनेमे याचवर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा
-वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय
-सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.